हा स्वतः दहावी दोनदा नापास..; मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना स्वतःच्या हाताने ट्विट तरी करता येत का असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावल्या नंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राऊतांचा समाचार घेतला आहे. विनायक राऊत हे स्वतः दहावी दोनदा नापास आहेत असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली.

निलेश राणे म्हणाले, तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो अशा शब्दात राणेंनी समाचार घेतला.

विनायक राऊत नेमकं काय म्हणाले होते-

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत म्हणाले होते की , शिंदे यांना स्वत: ट्विट करता येतं का? कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? एकनाथ शिंदेंना आमदार केल्याचा मला पश्चाताप होत आहे. माझ्या हातून मोठे पाप झाले आहे. मी शिफारस केली नसती तर त्यांना आमदारकी मिळाली असती का?’ असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला होता

Leave a Comment