घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय – राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित आहेत तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय असं वक्तव्य राणे यांनी केले आहे.

कोरोना केसेस वाढतायत, पीपीइ किट्स व आयसोलेशन बेड्स कमी, यंत्रणेवर सरकारचा अंकुश नाही, कायदा मोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे, रुग्णांची गैरसोय होत आहे, मुख्यमंत्री फक्त फेसबुक वर दिसतो आहे असं म्हणत राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधीपक्ष भाजप जोरदार टीका करत आहे. देशभरात कोरोनाशी झुंज देणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य योद्ध्यांना सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या PPE किट्स अजूनही उपलब्ध होत नाही. या संबंधीचे वृत्त माध्यमांमध्ये येतच असते. अश्याच एका वृत्ताचा दाखला देत राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

Leave a Comment