रोहित तुला साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली..मतदार संघावर लक्ष दे – निलेश राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांनी साखर उद्योगांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्यावरून राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी साहेबांनी कुकुटपालनाचीही मागणी केल्याचं ट्विट करत राणे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता निलेश राणे यांनी पुन्हा एक ट्विट करून रोहित तुला साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली..मतदार संघावर लक्ष दे असं म्हटलं आहे.

मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे असं म्हणत राणे यांनी पवार यांना चिमटा काढला आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी असं म्हणत राणे यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान सर्वप्रथम, निलेश राणे यांनी साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर ऑडिट झालंच पाहिजे अशी मागणी केली होती. तसेच साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या साखर उद्योगाबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या पत्रावर टीका केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी राणे यांना जोरदार प्रत्युत्तर देत साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी. असे म्हटले होते.

Leave a Comment