केरळमधील हत्तीणीच्या हत्येवरून निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशाचे राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात राजकारणाचाही वेगळाच खेळ सुरु आहे. सतत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी हे जणू महाराष्ट्राला आता रोजचेच झाले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे निलेश राणे आता त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून पुन्हा एकदा बोलले आहेत. सध्या अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांचे आंदोलन उसळले आहे. तर केरळमध्ये झालेल्या हत्तीणीच्या हत्येमुळे भारतातही निषेध केला जात आहे. या दोन्ही गोष्टींचा दाखला देत निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे.

अमेरिकेत एका गौरवर्णीय पोलिसाने एका कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या केल्याच्या व्हिडीओवरून वातावरण संतप्त आहे. तर भारतात केरळ मध्ये एका गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला देऊन हत्या केल्याबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. यावरून निलेश राणे यांनी, “अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड नावाचा व्यक्ती आणि केरळला १ हत्ती हे दोन्ही मुत्र्युमुखी पडले. ह्या घटना वाईटच पण रोज आपल्या महाराष्ट्रात कोरोना नी मरणाऱ्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे पण काही लोकं फक्त ह्या दोन घटनेंचा दाखला देत आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणतायत. तुम्हीच ठरवा.” असे ट्विट केले आहे. एकूणच त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून येते आहे.

 

त्यांच्या या पोस्टनंतर अनेकजण यावर व्यक्त झाले आहेत. तुम्ही जो भाजपा चा चष्मा घातला आहे तो काढा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात भाजपा कसे या विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात घालत आहे. ते दिसेल तेही केवळ राजकीय स्वार्थासाठी असे काहींनी म्हंटले आहे तर काहींनी भारतातील मृत्यूमुळे मोदींना फासावर चढवले पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. निलेश राणे सतत सरकारला जेरीस धरू पाहत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी या ट्विटमधून सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment