रियाज भाटीचे पवार- ठाकरेंसोबतचे फोटो शेअर करत राणेंनी मलिकांना केला ‘हा’ सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रियाझ भाटी हा दाऊद इब्राहिम चा माणूस असून मोडींसोबत त्याचे फोटो कसे असावा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी रियाज भाटी याचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे फोटो शेअर करत नवाब मलिक यांना सवाल केला आहे.

नितेश राणे यांनी याबाबत ट्विट करत रियाज भाटी यांचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबतचे फोटो शेअर करत म्हंटल की, नवाब भाई म्हणत आहेत की रियाझ भाटी दाऊद चा माणूस आहे…. नवाब भाई याना नेमकं काय म्हणायचं आहे असे नितेश राणे यांनी म्हंटल.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले-

बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडलं होतं. रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे . देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो.  पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो.  पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे.

Leave a Comment