हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “चला हवा येऊ द्या” (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचा शंभरावा भाग देखील प्रसारित करण्यात येणार आहे. परंतु त्यापूर्वीच कार्यक्रमाच्या प्रेक्षकांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक म्हणजेच चला हवा येऊ द्याची ओळख असलेले डॉक्टर निलेश साबळे या कार्यक्रमातून निरोप घेणार आहेत.
चला हवा येऊ द्यातून निलेश साबळे बाहेर (Chala Hawa Yeu Dya)
डॉक्टर निलेश साबळे चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचले आहेत. त्यांच्या निवेदनाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. मात्र आता निलेश साबळे चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा भाग नसतील अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या चर्चेबद्दल बोलताना स्वतः निलेश साबळे यांनी म्हटले आहे की, “चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा आहे. कार्यक्रम सध्या चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेल”
दरम्यान, आजवर निलेश साबळे यांनी चला हवा येऊ द्या मालिकेत विविध भूमिका साकारले आहेत. तसेच त्यांनी आजवर प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून खळखळून हसवले आहे. त्यामुळेच निलेश साबळे यांच्याशिवाय चला हवा येऊ द्या मालिका चालणे अशक्य आहे, असे अनेकदा म्हटले जाते. परंतु सध्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा टीआरपी देखील खाली घसरला आहे. त्यामुळे ही मालिका लवकरच बंद पडेल असे म्हटले जात आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.