निढळ सोसायटी निवडणुकीत निलकंठेश्वर पॅनलचा दणदणीत विजय

आ .महेश शिंदे व जी डी फाउंडेशन च्या सिद्धिविनायक पॅनेल चा धुव्वा .....मा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे यशस्वी नेतृत्व

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

निढळ तालुका खटाव येथील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोसायटी निवडणूक मध्ये माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निलकंठेश्वर पॅनलने आमदार महेश शिंदे व जी डी फाउंडेशन च्या गजानन खूस्पे यांच्या सिद्धिविनायक पॅनेल चा धुव्वा करून 13 -0 असा दणदणीत विजय प्राप्त केला. दोन्ही पॅनल तर्फे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. निढळ गावचे नाव राज्यभर पोचवणारे चंद्रकांत दळवी यांनी निढळ मध्ये अनेक विकासाची कामे केली. निढळला आदर्श गाव बनण्यासाठी त्यानीं खूप प्रयत्न केले .याचा सारासार विचार करून मतदार राजाने निलकंठे श्वर पॅनल ला मोठ्या फरकाने विजयी केले.

आमदार महेश शिंदे व जी डी फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखालील सिद्धिविनायक शेतकरी सहकारी विकास पॅनल चा एकही उमेदवार निवडून आला नाही . त्यामुळे आमदार गटाला मोठा धक्का बसला. मागील दीड वर्षापूर्वी या गटाने ग्रामपंचायत निवडणूक जिंकली होती . त्यामुळे या निवडणुकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते.

ही निवडणूक गाजली ती निलकंठेश्वर पॅनेल च्या नाविन्यपूर्ण बॅनर बाजी मुळे .हे बॅनर जिल्हा मध्ये मध्ये चर्चेचे विषय बनले होते .मतदार राजाला प्रलोभना पासून दूर राहण्या साठी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पक बॅनर बाजी करण्यात आली होती. एक आगळ्या वेगळ्या प्रकारची निवडणूक पहावयास मिळाली. अखेर या विजयानंतर विजयी उमेदवार व दळवी यांच्या वर मोठी गुलालाची उधळण झाली.

विजयी उमेदवार व त्यांची मते –

सर्वसाधारण उमेदवार शिंगाडे दादा 482,
शशिकांत खूस्पे 480,
जोतिराम खूस्पे 479,
केंजळे मारुती 478,
पोपट जाधव 474,
भिमराव माने 473गो
पाळ दळवी 466,
विश्वनाथ शिंदे 466,
महिला राखीव शोभा खूस्पे 488,
शारदा घाडगे484,
इ मा प्रवर्ग प्रल्हाद पवार 495,
अनुसूचित जाती अरविंद बोबडे 485,
विमुक्त जाती आनंदराव पिंगळे 494

दरम्यान, विजयी उमेदवारांचे मा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी ,आमदार शशिकांत शिंदें ,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते ,पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे , जी .प.नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे ,मा सरपंच श्रीरंग निर्मळ,यशवंत जाधव ,श्रीकांत घाडगे , पतसंस्था चेअरमन दत्तात्रय खूस्पे ,पांडुरंग दळवी ,संतोष खूस्पे ,शंकर खूस्पे, अशोक यादव शशिकांत पवार ,अविनाश शिंदे, संदीप दळवी यांनी अभिनंदन केले.