देवेंद्र फडणवीस लेखी माफी मागा, अन्यथा…; निलोफर मलिक खान यांची कायदेशीर नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून मलिक यांची कन्या व समीर खान यांची पत्नी निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना आता कायदेशीर नोटीस पाठवले आहे. “आपल्या पतीवर केलेला आरोप चुकीचा असून अब्रू नुकसानीची दावा करत आहे. त्यामुळे तत्काळ लेखी माफी मागावी, अन्यथा मानहानीचा गुन्हा दाखल करू,” असे नोटीसीत खान यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ” भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझे पतीच्या घरात ड्रग्ज सापडल्याचे सांगितले आहे. पण माझ्या पतीच्या घरात कोणताही ड्रग्ज सापडलेला नाही, असे पंचनाम्यात स्पष्टपणे सांण्यात आले आहे.

आज फडणवीस यांना नोटीस पाठवलेली आहे. फडणवीस यांनी क्षमा मागितली नाही, तसेच शब्द वापस घेतले नाही, तर त्यांच्याविरोधात मानहाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असा इशारा निलोफर मलिक खान यांनी दिला आहे.

Leave a Comment