नीरव मोदींची १,४०० कोटींची मालमत्ता भारत सरकारच्या ताब्यात; संपत्तीत ‘या’ महागड्या वस्तू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याला कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने आता आदेश दिले आहेत की, नीरव मोदी याच्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात. नुकताच पीएमएलए कोर्टाने हा आदेश दिला आहे, जेथे नीरव मोदीविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालविला जात होता. कोर्टाच्या आदेशानंतर आता नीरव मोदींच्या सुमारे १४०० कोटींच्या मालमत्तेवर भारत सरकारचा अधिकार असेल. नीरव मोदींचा खजिना किती मोठा आहे आणि त्यात कोण कोणत्या गोष्टी आहेत, ते जाणून घेउयात.

ग्रॉसवार्नर हाऊस फ्लॅट
कोर्टाच्या या आदेशानुसार नीरव मोदींच्या ग्रॉसवार्नर हाऊसचे फ्लॅटही जप्त केला जाऊ शकेल. त्याची किंमत सुमारे १७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

कोहिनूर सिटीतले फ्लॅटस कुर्ला पश्चिम, मुंबईतील कोहिनूर सिटीमधील तळ मजला, तिसरा मजला आणि चौथा मजला हे संपूर्ण नीरव मोदी याचे आहेत, ज्याची किंमत ९० कोटी रुपये आहे. हे फ्लॅट्सही जप्त केले जाऊ शकते असे सांगण्यात येते आहे. या मालमत्तांवर सुमारे ९ कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरणे बाकी आहे.

पेनिंसुला बिझिनेस पार्कची प्रॉपर्टी
नीरव मोदी यांची पेनिंसुला बिझिनेस पार्कमध्ये कमर्शियल प्रॉपर्टी आहे, सरकार त्यासही जप्त करू शकेल जेणेकरुन त्यांना पीएनबी बँक घोटाळ्याची रक्कम वसूल करता येईल. या मालमत्तेची किंमत सुमारे ७९ कोटी रुपये इतकी आहे.

समुद्रमहाल फ्लॅट्स
मुंबईतील वरळी भागातील गगन चुंबी इमारती असलेले सी फेसिंग असलेले समुद्र महाल फ्लॅट्स बर्‍याचदा चर्चेत असतात. नीरव मोदी आणि त्याची पत्नी एमी मोदी यांच्या नावावर येथे अनेक फ्लॅट्स आहेत. नुकत्याच माध्यमांमधील वृत्तानुसार त्यांचे मूल्य सुमारे ९०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते.

मफतलाल सेंटरचा ६ वा मजला
नीरव मोदी याच्याकडे मफतलाल सेंटरचा सहावा मजलाही आहे, जो कोर्टाच्या आदेशानुसार ताब्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की त्याची किंमत सुमारे ५५ कोटी रुपये आहे. यापूर्वीच्या कोर्टाच्या आदेशानुसार ही जागा जप्त करण्यास मनाई करण्यात आली होती.

रिदम हाउस
नीरव मोदी याचे मुंबईच्या काळा घोडामध्ये रिदम हाउस आहे, ज्याला सरकार जप्त करू शकते. याची किंमत सुमारे ३२ कोटी रुपये आहे.

कर्जतची जमीन, इमारत, मशीनरी
नीरव मोदीकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या कर्जतमधील सुमारे ५३ एकर जमीन, इमारत तसेच मशीनरी जप्त करता येईल. त्याची किंमत अंदाजे ७० कोटी रुपये इतकी आहे. एवढेच नव्हे तर कर्जत येथे नीरव मोदी याच्या नावावर सुमारे १३५ एकर जमीन असून, सुमारे ५२ कोटी रुपये किंमतीची ही जमीन आहे. हि जमीनही जप्त केली जाऊ शकते.

ईडीने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे
यापूर्वीच ईडीने नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्यासाठी कारवाई केली आहे. मार्च २०२० मध्ये त्यातील काही मालमत्तांचा लिलावही करण्यात आला आहे, ज्याच्यामधून ५१ कोटी रुपये मिळाले आहेत, ज्याला ईडीने जप्त केले. यामध्ये रोलिंग रॉयस कर, एमएफ हुसेन आणि अमृता शेर-गिल यांच्या पेंटिंग्ज आणि डिझायनर हँडबॅग्जचा समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment