Monday, February 6, 2023

Nirbhaya Case | चारही आरोपींना तिहार जेलमध्ये फाशी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी देण्यात आली. न्यायव्यवस्थेमधील पळवाटांमुळे दोन वेळेला ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. गुरुवारी या शिक्षेविरोधातील सर्व याचिका फेटाळल्यानंतर २० मार्च २०२० रोजी सकाळी पावणेसहाच्या दरम्यान या चारही आरोपींना फाशी देण्यात आली. Nirbhya Case

- Advertisement -

या फाशीनंतर देशभरातून जल्लोष व्यक्त केला जात असून निर्भयाच्या आईसह सर्व सामान्य नागरिकांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.