Nirbhaya Case : दोषींच्या वकीलाची कोर्टाला अजब विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्भया प्रकरणात दोषींच्या वकीलाने पुन्हा एकदा न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सांगितले आहे. पटियाला हाऊस कोर्टात या खटल्याच्या सुनावणी दरम्यान दोषींचे वकील ए.पी सिंह यांनी दोषींची फाशीची शिक्षा थांबविण्याचे कोर्टाला विनंती केली. मात्र, ही विनंती करत असताना दोषींच्या वकिलाने अजब तर्क देत शिक्षा थांबवा असं कोर्टला सांगितलं. Nirbhaya Case

वकील ए.पी सिंह यांनी दोषींना फाशी देण्याऐवजी त्यांना पाकिस्तान सीमा किंवा डोकलाम येथे पाठविण्यास सांगितले. सर्व दोषी देशाची सेवा करण्यास तयार असून त्यांना फाशी न देता सिमेवर पाठवा अशी विनंती ए.पी सिंह यांनी कोर्टाला केली. दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व दोषींना शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं दोषींच्या वकिलाने शेवटचा प्रयन्त म्हणून दोषी देशसेवा करण्यास तयार असल्याची सबब पुढे केली आहे.

दोषींपैकी पवन गुप्ता याची क्यूरेटिव याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर पवन आणि अक्षय यांची दुसरी दया याचिका राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. Nirbhaya Case त्याचबरोबर पटियाला हाऊस कोर्टानेही या प्रकरणातील दोषींनी दाखल केलेली फाशी थांबविण्याची मागणी केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळं आता या सर्वांना फाशी देण्यास आता कोणताही अडथळा उरलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment