नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देण्याचा दिवस अखेर ठरला. आता त्या नराधमांना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. पटियाला हाऊस कोर्टाने ही नवीन तारीख जाहीर केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार हे या खटल्यातील दोषी मुकेश कुमार सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करीत होते. फाशीची तारीख 22 जानेवारीपासून पुढे ढकलण्यात आली होती.फाशीच्या शिक्षेसाठी डेथ वॉरंट नव्याने जारी करण्यात आले आहे.
2012 Delhi gang-rape case: A Delhi court issues fresh death warrant for convicts for 1st February, 6 am pic.twitter.com/hHvXo6Av1d
— ANI (@ANI) January 17, 2020
सरकारी वकील इरफान अहमद यांनी कोर्टाला सांगितले की मुकेश यांची दया याचिका राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शुक्रवारी फेटाळली. 16 डिसेंबर 2012 रोजी रात्री 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थ्यावर सामूहिक बलात्कार केला. 2 डिसेंबर 2012 रोजी सिंगापूरमधील रुग्णालयात निर्भयाचा मृत्यू झाला. यापूर्वी निर्भयाच्या दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार होती, परंतु दोषींच्या दया याचिका प्रलंबित राहिल्याने त्याला उशीर झाला. चार दोषींमध्ये मुकेश सिंग, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांचा समावेश आहे. एका दोषीने तुरुंगात फाशी घेऊन आत्महत्या केली.