अर्थमंत्री Live: निर्मला सीतारामन यांनी आज कोणत्या घोषणा केल्या? वाचा अडेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. पॅकेजविषयी आज तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन घोषणा केल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित ११ महत्वाच्या घोषणा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंबंधी यातील ८ घोषणा आहेत. तर प्रशासकीय सुधारणांसंबंधी ३ घोषणा आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८७०० कोटी रुपये जमा केले
लॉकडाउनच्या काळात एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमतीवर ७४,३०० कोटी रुपयांच्या शेती मालाची खरेदी केली. पीएम किसान फंडातंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८७०० कोटी रुपये जमा केले.

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी तातडीचे १ लाख कोटींचं पॅकेज
शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

वन औषधीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची तरतूद
वन औषधीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या दोन वर्षात १० लाख हेक्टरवर वन औषधींचे उत्पादन घेतले जाईल. शेतकऱ्यांना यातून ५ हजार कोटीचे उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी २० हजार कोटींची घोषणा
समुद्री आणि देशांतर्गत मासेमारीच्या विकासासाठी सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणली आहे. यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ५५ लाख लोकांना यातून रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

 

इतर महत्त्वाच्या घोषणा

2 कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देणार

समुद्री आणि आंतर्देशीय मत्स्य पालनासाठी ११००० कोटी , अंतगर्त सुविधेसाठी ९००० कोटी.

पुढील पाच वर्षात ७० लाख टन मत्स्य उत्पादनाचे लक्ष्य , ५५ लाख रोजगार , दुप्पट निर्यात होणार.

डेअरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी १५००० कोटी.  डेअरी कर्जाच्या व्याजावर 2 टक्के सूट

मधुमक्षिका पालनासाठी ५०० कोटींची योजना, शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन.

शेतमालावरील वाहतुकीचे भाडे आणि शीतगृहातील खर्चावर ५० टक्के अनुदान.

अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १० हजार कोटींची तरतूद

लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’

जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करणार

टॉप टू टोटल योजनेला ५०० कोटींची तरतूद

पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी 13 हजार 300 कोटीचं पॅकेज

नवीन अपडेट्ससाठी पेज रिफ्रेश करत राहा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment