अलिबाग । हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळ शक्यता आहे. त्यामुळे अलिबागमध्ये एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. तसेच नागरिकांना सतर्कत राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता निसर्ग अलिबागला धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी निधी यांच्या माहितीनंतर अलिबाग येथे एनडीआरएफची आणखी दोन पथके दाखल होणार आहेत. दरम्यान, सध्या श्रीवर्धन आणि अलिबाग येथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे.
अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली, उद्यापर्यंत या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर परवापर्यंत गंभीर स्वरुपाच्या चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता असून, हे वादळ येत्या ३ जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबई, कोकणासह दक्षिण गुजरापर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्ट्यांवर एनडीआरएफच्या १५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. श्रीवर्धन येथे आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर श्रीवर्धन येथे पावसाला सुरुवात झाली आहे. वादळाचा धोका पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”