संजय राऊत – देवेंद्र फडणवीस भेट ईडी चौकशीमुळेच ??? नितेश राणेंनी व्यक्त केली शंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्या असल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. “प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत

“संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत,” असंही नितेश राणे म्हणाले. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे यांनी यावेळी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. काहीही झाले की राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदत मागत आहे. हे म्हणजे ‘माझ्या मुलाचे लग्न आहे आणि पैसे नाहीत म्हणून केंद्र सरकारने मदत करावी’ असा प्रकार आहे, असा टोला नितेश यांनी लगावला.

दरम्यान, संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील कारवाईवरुन भाजपला लक्ष्य केलं. “चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही.मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला ईडीची नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही असे संजय राऊत म्हणाले होते. मला असं कळलं की जुनी थडगी उकरण्याचा प्रयत्न, वीस-वीस वर्षांपूर्वीचं उत्खनन सध्या सुरु आहे. ईडीवाले मोहेंजोदडो, हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत,” असं संजय राऊत म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment