सिंधुदुर्ग | महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री संजय राठोड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर उपकार केले का असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. भाजपने राठोड यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार रान पेटवले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भुमिका घेत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर आज राठोड यांनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेऊन आपला राजीनामा दिला. मात्र राठोड यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. आता राठोड यांच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणकोण होते याचा तपास पोलिसांना करायला हवा. तसेच जे दोषी आढळतील त्यांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करायला हवी असं राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान,