“महाराष्ट्र हा एवढा मोठा शब्द काढायला ताकद लागते ताकद” ; नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आयकर विभागाच्यावतीने राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजप नेते नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “रात्री सातनंतर नाईट लाईफ गँग चालवायची आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही. यात भाजपाचा काय संबंध? हा छापा राहुल कनाल यांच्यावरच का पडला? महाराष्ट्र तुमच्यासमोर कधीच झुकणार नाही. कारण तुम्ही महाराष्ट्र विकायला निघालेला आहात. महाराष्ट्र हा एवढा मोठा शब्द काढायला ताकद लागते”, असा टोला नितेश राणेंनी खोचक टोला देखील लगावला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले “आदित्य ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आहेत असं कुठे म्हटलंय? ते म्हणजे पेंग्विन गँग, नाईट लाईफ गँग हे समजू शकतो. महाराष्ट्र हा एवढा मोठा शब्द काढायला ताकद लागते. वास्तविक पाहता लक्षात घेतले तर राहुल कनाल यांचा कॅफे बँड्रा नावाचा एक रेस्टॉरंट चालतो. तेथील सर्व स्ट्रक्चर हे अनियमितच आहेत. कोरोनाच्या महामारीच्या काळात कोविड संदर्भात ज्या निविदा निघाल्या, त्यातही कनाल यांचा कुठेतरी हस्तक्षेप असल्याचा अनेकांना संशय आहे.

मुंबईतल्या नाईट लाईफ गँगचा राहुल कनाल सदस्य आहे. राहुल कनाल कुणाचे निकटवर्तीय आहेत? संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत? त्यांच्यावर एवढी कृपादृष्टी का की त्यांना थेट शिर्डीच्या संस्थानावर ट्रस्टी म्हणून पाठवलं गेलं? राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत राहुल कनालचं देखील नाव होते, असे आम्हाला समजले आहे. नेमका या राहुल कनालकडे एवढा पैसा आला कुठून?”, असा प्रश्न राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Comment