भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे? राणेंचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असून आता ही यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा काश्मीर पर्यंत जाणार असून या पदयात्रेत आत्तापर्यंत अनेक कलाकार, राजकीय नेते आणि गोरगरीब जनतेने सहभाग नोंदवला आहे. त्याच दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे देऊन आणले आहे असा आरोप केला आहे.

नितेश राणे यांनी एका व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई… हा पप्पू कधी पास नाही होणार असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकतच या यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला आहे. आता भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे मात्र गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी २ दिवसांसाठी गुजरातला गेले असल्याने भारत जोडो यात्रा २ दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी राहुल गांधी थेट संवाद साधत असून जनतेच्या व्यथा जाणून घेत आहेत.