नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाला शरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या नंतर आज नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण आले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र ते पहिल्याच दिवशी न्यायालयात हजर झाले आहेत.

नितेश राणे यांच्या सोबतच वकील माणशिंदे आणि बंधू निलेश राणे उपस्थित आहेत. नितेश राणे आज जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करतील. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे तातडीने सिंधुदुर्गात दाखल झाले होते. आज सकाळी राणेंच्या घरी बैठक पार पडली. त्यानंतर नितेश राणे हे न्यायालयाला शरण गेले.

नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला