महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता…; राणेंची ट्वीटद्वारे टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापण झाल्यापासून भाजपचे नेते नितेश राणे यांच्याकडून काही ना काही कारणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडी सरकारवर टीका केली जाते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांबाबत चिंता व्यक्त केल्या नंतर नितेश राणे यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता आहे. पण त्यांच्याच राज्यात राहणाऱ्या हिंदूंना रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनांकडून नेहमीच लक्ष्य केले जाते त्याचे काय? त्यांना कोण वाचवणार? असा सवाल राणेंनी केला आहे.

नितेश राणे यांनी आज सकाळी एक ट्विट केले असून ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काश्मिरी पंडितांची चिंता कधीपासून वाटू लागली. मायत, त्यांनी काळजी करू नये. काश्मीर मोदींच्या सुरक्षित हातात आहे. त्याची काळजी करू नका !!, असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महिनाभरात नऊ हिंदूच्या आत्महत्या झाल्या आहेत. तिथून अनेक हिंदू आपलं घर सोडून इतर प्रदेशात जात आहेत. काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील हिंदू भयभीत झाला आहे, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते.

Leave a Comment