म्हणून नेहमी सांगतो.. चड्डीत राहायचं; राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घमासान सुरू आहे. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली होती. सामनातून देखील राणेंवर कडक शब्दांत टीका करण्यात आली होती. मात्र आजच्या अग्रलेखात राणेंच्या तोंडात साखर पडो अस म्हणल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.

सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे..काही “आडनाव” ऐकली.. कि शिवसेना लगेच गोड होते..आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात..युतीची आठवण येते.. सगळ एकदम गोड गोड..म्हणून नेहमी सांगतो..चड्डीत राहायचं!!! अस म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले.

सामनातून नेमकं काय म्हंटल –

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला सुगीचे दिवस येण्यासाठी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून मी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असे केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सांगितले. जे त्यांनी यात्रेच्या सुरुवातीला सांगायला हवे होते ते त्यांनी सगळय़ात शेवटी सांगितले! महाराष्ट्र हे राजकीय मतभेदांपलीकडे, विकासाकडे पाहणारे राज्य आहे. श्री. राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी एक विधायक भूमिका घेतली. त्यामुळे ‘सामना’ने विधायक कार्याला पाठिंबा दिला. अज्ञानाचा अंधकार महाराष्ट्रावर कधीच पसरला नव्हता, तरीही केंद्रीय मंत्री राणे राज्याला सुगीचे दिवस आणायचे म्हणतात, त्यांच्या तोंडात साखर पडो! अस सामनातून म्हंटल.

Leave a Comment