युवा शिवसैनिकांना नितेश राणेंचा इशारा : आम्ही तुमची वाट बघतोय, सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवण्याची हिंमत करू नका

Nitesh Rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | काल रायगडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. युवा शिवसैनिकांना आम्ही तुमची वाट बघतोय, सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करू नका असे नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी  ट्विट केले आहे.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हणाले आहे की, माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नारायण राणे यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तर नाशिकमध्ये पोलिसांच्या सायबर सेलकडून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.