वृत्तसंस्था | स्वप्न दाखवणारा नेता लोकांना आवडतो. परंतु दाखवलेले स्वप्न पूर्ण केले नाही तर, जनता अशा नेत्यांना झोडल्याशिवाय राहत नाही. असे वक्तव्य भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले.
गडकरी पुढे म्हणाले, ‘जनतेला असेच स्वप्न दाखवा की, जे पूर्ण होऊ शकतील. मी स्वप्न दाखवणाऱ्यातला नाही तर, मी जे बोलतो ते स्वतः लक्ष घालून १०० टक्के करून दाखवतो.’
मागच्या काही दिवसांपासून गडकरींच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमामध्ये उलटी सुलटी चर्चा चालू आहे. त्यातच गडकरींनी केलेल्या आजच्या वक्तव्यामुळे त्यांच्यातला प्रामाणिकपणा स्पष्ट होत आहे. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसहित बाकी मंत्र्यांचं काय? अशा प्रकारची चर्चा लोकांमध्ये होत आहे.
https://twitter.com/ANI/status/1089502342460915714?s=19