नागपूरात धावणार भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक बस; तिकिटात मिळणार 30% सवलत

Electronic bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तंत्रज्ञानातील प्रगती बघता आता इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अलीकडे रस्तावर इलेक्ट्रॉनच्या गाड्या धावताना दिसतात. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतामध्ये पहिली चार्जिंगवर चालणारी बस सुरु होणार असल्याची घोषणा केली. या बसमध्ये बसल्यानंतर विमानात बसल्यासारखा अनुभव येईल असे नितीन गडकरी म्हणाले. डिझेल बसपेक्षा कमी तिकीट असणारी इलेक्ट्रॉनिक बस नागपूरमध्ये धावणार असून, त्याचे तिकीट 30% कमी असणार आहे. केंद्रीय मंत्री यांच्या या भाष्यामुळे लोकांना मोठी उत्सुकता लागली आहे.

अतिक्रमण करणे सोडावे

नागपुरातील वाडी येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर लगेच वाडी नगर परिषदच्या इमारतीचा सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी लोकांना इलेक्ट्रॉनिक बस लवकरच नागपूर मधून धावणार असल्याचे सांगितले . एकेकाळी रोडवर ट्रकचे साम्राज्य होते. पण अलीकडच्या आधुनिकीकरणामुळे हे चित्र बदलले आहे. विकासासाठी नागरिकांनी अतिक्रमण करणे सोडावे, असे नितीन गडकरी म्हणाले .

वाहतूक कोंडी कमी होणार

विजेवर चालणाऱ्या या बसमुळे कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होईल. जी पर्यावरणास तसेच हरित ऊर्जा वापरण्यासाठी महत्वाची ठरू शकेल. या बसची खासियत म्हणजे, इतर बस पेक्षा इलेक्ट्रॉनिक बसचे तिकीट 30 % कमी असणार आहे. यामुळे प्रवाश्याना कमी खर्चात प्रवास करता येईल. या बस एलिव्हेटेड मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दीपासून या बसेस प्रवाशांना मुक्तता देणार आहेत. त्याचा फायदा शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. एकदा हि बस चार्जिंग केल्यास ती 50 किमी धावेल. विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा देशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे. हि बस 18 मीटर लांब असून, ती टाटा आणि स्कोडा या नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांच्या एकत्रीकरणातून विजेवर चालणारी खास बस तयार केली जाणार आहे.

ऍग्रो व्हिजन भूमिपूजन

ऍग्रो व्हिजन शेतकरीचे भूमिपूजन गडकरी याच्या हस्ते पार पडले. यावेळी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत ते म्हणाले, फक्त खाद्य पिकांचे उत्पादन करू नका, त्यामुळे शेतकरी कधीच श्रीमंत होणार नाही. श्रीमंत होण्यासाठी बायोफ्यूल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादन करावे. नागपूर या भागात कापूस, सोयाबीन आणि संत्री याचे उत्पादन जास्त आहे. पण शेतकऱ्यांना त्यामध्ये नफा होत नाही. त्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. लवकरच शेतकऱ्याचं मालाला चांगला भाव दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.