महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |१६ व्या लोकसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील आठ नेत्यांना मंत्रीपदे मिळाली होती. हि सध्या सध्या कमी अधिक होण्याची शक्यता आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यातील नेत्यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांची मंत्रीपदे पक्की मानली जात आहेत.

कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना उत्तर

गोयल गडकरी यांच्या जोडीला सुरेश प्रभू यांचे देखील मंत्रीपद कायम राहण्याची शक्यता आहे. तर अनंत गीते आणि हंसराज अहिर यांच्या पराभवा नंतर त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची देखील शक्यता आहे. तर पुण्याचे प्रकाश जावडेकर देखील मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच रावसाहेब दानवे यांचा मंत्रिमंडळात केल्या जाण्याच्या चर्चेला देखील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. त्याच प्रमाणे रामदास आठवले यांनी युतीच्या केलेल्या प्रचारावर भाजपचे नेते खुश आहेत. त्यामुळे त्यांना देखील मंत्रीपदाची पुन्हा संधी दिली जाणार आहे असे बोलले आहे. सुभाष भामरे यांचे देखील मंत्रीपद कायम राहणार आहे. तसेच डॉ. हीना गावित आणि पूनम महाजन यांच्या पैकी एका खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा !

शिवसेनेकडून मंत्री पदाचे दावेदार असणारे चार नेते पराभूत झाले असल्याने शिवसेना आता कोणाला मंत्री करते हे देखील बघण्यासारखे राहणार आहे. तर अनिल देसाई यांना यावेळी मंत्रीपदाची संधी दिली जाईल असे देखील बोलले जाते आहे. दरम्यान शिवसेनेला यावेळी दोन कॅबिनेट मंत्रीपदेपाहिजे आहेत. यासाठी उद्धव ठाकरे आज अथवा उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तेथे ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी या विषयी चर्चा करण्याची शक्यता आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय

स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

हा नेता आहे भाजपच्या भव्य विजयाचा शिल्पकार

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला

Leave a Comment