नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती..! : अशोक चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपने केंद्रात सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्णझाली आहेत. मात्र विरोधाची पक्षातील नेत्यांनी भाजपने या सत्तास्थापनेनंतर आतापर्यंत काय केले आणि काय नाही याबाबत पंचनामा केला. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकारांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना अशोक चव्हाण यांनी उत्तरे दिली. यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते आणि ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. नितीन गडकरी म्हणजे ‘चूकीच्या पक्षात योग्य व्यक्ती… ‘ अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

याबाबत बोलताना अशोक चव्हाण यांनी बोलताना म्हंटले की, “नितीन गडकरी महाराष्ट्रातील मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा गांभीर्याने विचार करतात. मी एकतर लेख लिहून किंवा ट्विटरवरुन त्याच्या कार्याचे कौतुक करतो. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करतो. चुकीच्या पक्षात ती योग्य व्यक्ती आहे” असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

राम तेरी गंगा मैली प्रत्यक्षात उतरवले

यावेळी बोलताना चव्हाण यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर टीकास्त्र डागले ते म्हणाले, “शेकडो मृतदेह गंगेत प्रवाहित होऊ देणाऱ्या मोदी सरकारला पाहून राज कपूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील ‘राम तेरी गंगा मैली हो गई, पापीयों के पाप धोते-धोते’ या गाण्याची आठवण होते. मोदी सरकारने या गाण्यातील शब्द प्रत्यक्षात उतरवले आहेत.अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलीन करण्याचे महापाप या सरकारने केले”.

मागील ७ वर्षात देशाला काय मिळालं ?

पिढी बोलताना मागील ७ वर्षात भाजप सरकारने अनेक चुका केल्याचे सांगत भाजपच्या कार्यावर टीका केली. मागील सात वर्षांत देशाला नोटबंदी, जीएसटी, कोरोनाकडे दुर्लक्ष अशा एका पाठोपाठ एक विनाशकारी घोडचुका मिळाल्या.आणि ने त्या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही केवळ राजकीय अहंकारातून त्यात सुधारणा नाकारणारे हटवादी राज्यकर्ते मिळाले.मागील सात वर्षांत देशाला आधीच्या पिढ्यांनी दूरदर्शीपणे उभी केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून चैन करणारे दिवाळखोर सरकार मिळाले. साम, दाम, दंड, भेद कसेही का होईना, पण फक्त निवडणूक जिंकणे हेच एकमेव उदिद्ष्ट ठेवून काम करणारी सत्तापिपासू राजकीय व्यवस्था मिळाली.मागील सात वर्षांत देशाला बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळती अर्थव्यवस्था मिळाली. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना शंभरीपार झालेले पेट्रोल मिळाले. गरिबांना अधिक गरीबी तर निवडक धनदांडग्यांना अधिक श्रीमंत होण्याची खुली सूट मिळाली.

Leave a Comment