एकनाथजींना आम्ही असे अमृत पाजले आहे की…; नितीन गडकरींचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा किल्ला चांगलाच ढासळला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. शिंदे याच्या बंडखोरीनंतर त्यांनी भाजपसोबत आघाडी करत महाराष्ट्रात शिंदे- फडणवीसांचे सरकार आणले. त्यानंतर भाजप नेत्यांकडून शिंदे यांचे चांगलेच कौतुक केले जाऊ लागले आहे. आज मुंबईतील ताज पॅलेसमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी मोठं विधान केले आहे. “आम्ही एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल. बुलेट ट्रेनच्याही पुढे जाईल,” असे गडकरींनी म्हंटले आहे.

मुंबईत ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमातील ‘संकल्प से सिद्धी’ परिषदेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले की, आपण देशाला मार्गदर्शन करु शकतो. मागील आठ वर्षांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. आपण देशाला आर्थिक घटकांवर आघाडीवर नेऊ शकतो. नागपूर- हैद्राबाद महामार्गाबाबत विचार सुरु आहे.

माझ्याकडेही हायड्रोजनची गाडी आहे. महाराष्ट्र भूमिका घेईल तर गोष्टी बदलतील. 65 प्रोजेक्ट मी बनवत आहे, यातील काही महाराष्ट्रात आहेत, असे गडकरी यांनी यावेळ सांगितलेय. नवी मुंबई ते नवीन विमानतळापर्यंत आपण 17 मिनिटात रो-वेनं पोहोचू असा एक प्रकल्प असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment