नितीन गडकरींनी केली नव्या रेल्वे मार्गाची घोषणा

Thumbnail 1533137567624
Thumbnail 1533137567624
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | धडाडीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आणखी एका नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. मनमाड – इंदोर रेल्वे मार्गाची घोषणा गडकरी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली आहे. ३६२ किलोमीटर लांब लोहमार्गाच्या खर्चाची अंदाजित रक्कम ८,५७४ कोटी रुपये इतकी आहे. त्याचा महाराष्ट्रात येणारा भाग १८६ किलोमीटर इतका असून मध्यप्रदेशात १७६ किलोमीटर एवढा भाग येतो आहे.
बहु प्रतिक्षित असणारा हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्याने देशाच्या या भागात आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील खान्देशाला मध्यप्रदेशाशी जोडण्यात हा लोहमार्ग दुवा ठरणार आहे. सुभाष भामरे यांच्या लोकसभा मतदारसंघाला या लोह मार्गाचा सर्वाधिक फायदा होत असल्याने त्यांनी गडकरींचे आणि मोदींचे आभार मानले आहेत.