Nitin Gadkari : विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती; गडकरींचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) संपूर्ण देशात आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर देशभरात ठसा उमटवणाऱ्या गडकरींचे सर्वच राजकीय पक्षासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे नितीन गडकरी सुद्धा भारताचे पंतप्रधान होऊ शकतात असं नेहमीच बोललं जात. त्यातच आता गडकरींनी एका कार्यक्रमांत बोलताना मोठा खुलासा केला आहे. २०२४ चाय लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, मात्र आपण ती फेटाळून लावली असं गडकरींनी सांगितलं.

पंतप्रधानपदासाठी पक्षाशी प्रतारण करणार नाही– Nitin Gadkari

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मी त्या नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारण करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

विरोधी पक्षाच्या कोणत्या नेत्याने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) पंतप्रधान पदाची ऑफर दिली हे मात्र गडकरींनी सांगितलं नाही. मात्र त्यांच्या या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा नितीन गडकरींचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलं हे मात्र नक्की. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी सुद्धा नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुरु होते, तशा चर्चा माध्यमात झळकत होत्या, मात्र तेव्हाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होत, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नेते आहेत, मला पंतप्रधान होण्यात काहीही रस नाही. मी पदासाठी नाही तर संघटनेसाठी काम करतो.