नितीन गडकरींची मोठी घोषणा !!! आता टोलनाक्यांऐवजी GPS द्वारे कापला जाणार टोल टॅक्स

नवी दिल्ली । भारतातील रस्त्यांची स्थिती वेगाने विकसित आणि विस्तारत आहे. आता ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहने धावत आहेत. इलेक्ट्रिक टोल प्लाझा सिस्टीम सुरू झाल्यामुळे टोल पॉईंट्सवर लागणारा वेळही बराच कमी झाला आहे. मात्र लवकरच तुमची या टोलनाक्यांपासूनही सुटका होणार आहे.

इलेक्ट्रिक टोल प्लाझानंतर आता सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकत GPS तंत्रज्ञानाद्वारे टोल वसूल करण्याची तयारी करत आहे. टोलवसुलीसाठी GPS सिस्टीम कार्यान्वित झाल्यानंतर टोलनाके हटवले जातील. यापुढे लोकांना राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर थांबावे लागणार नाही, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले- “सरकारने रस्त्यांच्या बाबतीत अनेक नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रॉनिक टोलद्वारे 97 टक्के वसुली होत आहे. आता आपल्याला GPS सिस्टीम घ्यायची आहे. यापुढे कोणताही टोल लागणार नाही. टोल नसणे म्हणजे टोल संपणार नाही. तुमच्या कारमध्ये GPS सिस्टीम बसवली जाईल. वाहनात आता GPS सिस्टीमही अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही जिथून एंट्री घेतली आणि कुठून सोडली ते GPS वर रेकॉर्ड केले जाईल आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील. यापुढे आता तुम्हांला कोणीही अडवणार नाही”

नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही भारतातील टोल प्लाझाच्या जागी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टीम आणण्यासाठी नवीन पॉलिसी आणण्याची तयारी करत आहोत.” म्हणजेच आता टोल टॅक्सची वसुली GPS द्वारे होणार आहे.

60 किलोमीटरमध्ये एकच टोलनाका
नितीन गडकरी म्हणाले की,”जनतेच्या सोयीसाठी आता राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 60 किमी परिघात एकच टोलनाका असणार आहे. एकापेक्षा जास्त सर्व टोलनाके हटवले जातील आणि हे काम 3 महिन्यांत पूर्ण केले जाईल.” 60 किमीच्या परिघात एकापेक्षा जास्त टोलनाके असणे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक लोकांसाठी पास 
नितीन गडकरी म्हणाले की,” टोलनाक्यांभोवती गाव किंवा शहरातील लोकांसाठी पास उपलब्ध करून दिले जातील. स्थानिक लोकांना आधार कार्डच्या आधारे पास दिले जातील. या सिस्टीमवर वेगाने काम केले जाईल.