पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेले विधान अगदी हास्यास्पद आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी आहे, असे राऊत यांनी टीका केली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेवरून प्रत्युत्तर दिले. तसेच टीकाही केली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी काल कोरोना काळात मुंबई व महाराष्ट्रातून जीवाच्या धास्तीने पलायन केलेल्या परप्रांतीयांमुळेच देशभरात कोरोना पसरला, असे विधान संसदेत केले.

मोदी यांचे हे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी कोणतेही पूर्वनियोजन न करता पुरेसा वेळ न देता टाळेबंदी लागू केली. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांवर विशेषत: मजुरावर देशोधडीला लागण्याची वेळ आली. हे आपले अपयश लपविण्यासाठी मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करण्याची पळवाट शोधली असल्याचेही यावेळी राऊत यांनी सांगितले.

Leave a Comment