महाराष्ट्रात वीज कापण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही; नितीन राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज थकबाकीसंदर्भात वीज वित्रांकडून वसुलीची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात अंधारात जाण्यापासून वाचविण्यासाठी काही पर्याय अवलंबवावे लागणार आहेत. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिवे यांची वीज थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे पत्रात म्हंटले आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, वीजपुरवठा खंडित करावा लागल्यास महावितरणवर आणि महाविकास आघाडी सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होईल. सध्या वीजेच्या थकबाकीसंदर्भात सांगायचे झाल्यास ग्रामविकास विभाग व नगरविकास विभाग यांच्याकडे मोठ्या प्रमाणत थकबाकी आहे. तसेच शासनाकडे आमचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान अडकले आहे. हे दोन्ही देण्याचा आदेश तत्काळ देण्यात यावेत.

महाराष्ट्रात असलेल्या वीज ग्राहकांना महावितरण कंपनीकडून २ कोटी ८० लाखांहून अधिक वीजपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना, नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे वीज वसुली होऊ शकलेली नाही. त्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व सार्वजनिक पथदिवे यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकी आहे.