निजामुद्दीन मरकज: पुण्यातील ६० जण क्वारंटाइनमध्ये, इतरांचा शोध सुरू -जिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी ‘मरकज’मधील कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. यंत्रणा आता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील लोकांना प्रशासनासमोर आहे.

दरम्यान, दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांत पुण्यातील अनेकजण सहभागी झाल्याचं समोर आलं आहे. सहभागी झालेल्या ६० जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतरांचा शोध घेण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे यासह अनेक जिल्ह्यात कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.

मरकजमधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती आहेत, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 16 जण उपस्थित असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील 16 जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये शहरी भागातील 6 तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे.

चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून हा व्यक्ती परतला आहे. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश होता. अकोल्यातील 4, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी 3 जणांचा यामध्ये समावेश आहे. परभणीत देखील दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील जमातमध्ये गेलेले 3 जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा