विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मागील अधिवेशनदेखील अध्यक्षविनाच पार पडले होते. तेव्हा पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु आता पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. हिवाळी अधिवेशन पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री ठाकरे अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाही, अशी माहिती समजत आहे. तसेच महाविकास आघाडीचे नऊ आमदार अधिवेशनात गैरहजर असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळण्यात आली आहे. या अगोदर दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असे पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते. पण राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत असल्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

Leave a Comment