देशभरात NRC लागू करण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाची संसदेत माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत सुधारित नागरिकत्व विधेयक मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार सरकार आधी नागरिकत्व कायदा आणणार आणि त्यानंतर एनआरसी असं सांगितलं होतं. यानंतर देशभरात तसंच अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु झालं होतं. दिल्ली आणि इतर काही भागांमध्ये गेल्या महिन्यापासून सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरु आहे. देशभर एनआरसी लागू करण्याबाबत अनिश्चितता असतांना आज लोकसभेत गृहमंत्रायाने याबाबत लेखी उत्तर दिलं आहे.

आज लोकसभेत प्रश्नोउत्तराच्या कालावधीत देशभरात एनआरसी देशभरात लागू करण्याची कोणती सरकारची योजना आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तर देत सांगितलं की, ‘सध्या तरी राष्ट्रीय स्तरावर एनआरसी प्रक्रिया लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”.

दरम्यान काल सोमवारी संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यावर चर्चा करण्याची मागणी केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जवळपास सर्व विरोधी पक्षांनी इतर कामकाज स्थगित करुन सीएए, एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा व्हावी अशी मागणी केली होती.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment