टीम, HELLO महाराष्ट्र । नामदेव पालखी सोहळ्यात जेसीबी घुसल्याने दिवेघाटात झालेल्या अपघातातील जखमींवर उपचार केले जातायत, मात्र शासनाने देऊ केलेली आर्थिक मदत अजूनही न पोचल्याने वारकऱ्यांना अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान शासनाच्या मदतीची वाट न बघता, माऊलींच्या पालखी सोहळयाचे चोपदार रामभाऊ रंधवे ह्यांनी अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी अहवान करून आर्थिक मदत जमविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, रामभाऊ चोपदार ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांपैकी पैकी 6 वारकऱ्यांवर मोठ्या शशत्रक्रिया झाल्या असून, त्यांच्या पूर्ण उपचारसाठी अकरा लाखांचा खर्च लागणार आहे, त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील ह्यांनी आर्थिक मदतीसाठी केलेलं अहवान ते पाळतात का ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलय.