भ्रमात असलेल्या विरोधकांच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी…; शिवसेनेची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार असल्याचे यापूर्वीच विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. यावरूनच आज सामनातून विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. “देशमुखांपासून ते परब, सरनाईक, अजित पवारांवर कारवाई करून राज्य सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधकांनी राहू नये. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केली तरी सत्ता त्यांना मिळणार नाही,” असे म्हणत ‘सामना’तून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या कोंडीत न सापडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून चांगलेच प्रयत्न करण्यात आले आहेत. तर सत्ताधारींना आपल्या डावपेचात अडकवण्यासाठी विरोधी भाजपकडूनही रणनीती आखली गेली आहे. आज सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर सामनातून ठाकरे सरकारने विरोधकांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे. भाजपच्या रणनीतीबाबत ‘सामना’तून मनातले आहे कि, भाजपची रणनीती म्हणजे सभागृहात गोंधळ घालायचा, बोलू द्यायचे नाही, कामकाज बंद पडायचे. विधानसभेच्या अध्यक्षांसमोर असलेल्या खुल्या जागेत जाऊन घोषणाबाजी करायची, अशी रणनीती भाजपकडून ठरवलेली दिसत असल्याचे ‘सामना’तून शिवसेनेने म्हंटले आहे.

सरकारवर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपा बद्दलही शिवसेनेने सामनातून म्हंटले आहे कि, विरोधी पक्षांचे पहिले कर्तव्य म्हणजे राज्य सरकारवर बेछूट आरोप करीत नामोहरण करायचे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून डेटासाठी कायदेशीर प्रयत्नांना कमी पडल्याचा गाजावाजा विरोधी पक्षाकडून सुरु आहे. केंद्र सरकारहि मराठा समाजाला आरक्षण देण्यात कमी पडले आहे. मग काय तेंच्या दारात बसून आक्रोश करायला पाहिजे काय? असा शिवसेनेने सवाल केला आहे.

Leave a Comment