Monday, February 6, 2023

आरोपी कोणत्या पक्षाचे असले तरी कठोरात कठोर शिक्षा होईल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

- Advertisement -

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर येथे घडलेला प्रकार अतिशय निदंनीय आहे. या प्रकरणात जो कोणी आरोपी आहे, त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल. आरोपी कोणत्या पक्षाचे किंवा कुठले आहेत, यांच्याशी पोलिसांचे काही काम नाही. गृहविभाग योग्य पध्दतीने काम करेल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

- Advertisement -

महाबळेश्वर येथील अल्पवयीन मुलीने एका बालकाला जन्म दिला आहे. तसेच या प्रकरणात शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांच्या मुलाचा सहभाग असल्याच्या प्रश्नावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्याला हादरवणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना महाबळेश्वरमध्ये घडलेली आहे.

या गुन्ह्यात प्रतिष्ठीत लोकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गृहराज्यमंत्री असलेल्या शिवसेना पक्षातील नेत्याच्या मुलाचा या गुन्ह्यात सहभाग आहे. त्यामुळे कायद्याप्रमाणे सर्वांना जो न्याय तोच न्याय कोण आरोपी आहेत. त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे न पाहता योग्य न्याय केला जाईल. तसेच आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी गृहविभाग आपले काम करेल असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला.