अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही ; पवारांकडुन गृहमंत्र्यांची पाठराखण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह प्रकरणात महाविकासआघाडी सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ATS चे कौतुक केले. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. “ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?”, असा आक्षेप शरद पवार यांनी घेतला आहे.

जर तुम्ही माजी पोलीस आयुक्तांचं पत्र पाहिलं, तर त्यांनी त्यात फेब्रुवारीच्या मध्याचा उल्लेख केला आहे. या काळात सचिन वाझेंना गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांना दिल्याचं ते म्हणतात. पण ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात दाखल होते”, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार का, हा प्रश्न विचारला. तेव्हा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असे सांगितले. रमबीर सिंग यांनी आरोप केलेत त्या काळात अनिल देशमुख कोरोना झाल्यामुळे नागपूरच्या रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. जे आरोप केले त्यात तथ्यच नाही, मग चौकशीचा मुद्दा येतो कुठून, अनिल देशमुखांना हटवण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment