व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोणीही स्वतःला देव समजू नये – संजय राऊत

टीम, HELLO महाराष्ट्र । राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये शिवसेनेने आज (सोमवारी) भारतीय जनता पक्षावर मोठा हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते स्वत:ला देव समजू लागले असून त्यांना वाटते की आम्ही काहीही करू शकतो, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आपणच देव आहोत ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भावना चुकीची असल्याचे राऊत म्हणाले. या देशात मोठमोठे बादशाह आले आणि गेले परंतु, देशातील लोकशाही कायम असल्याचे सांगत एनडीए कुण्या पक्षाची जहागिरी नसल्याचे राऊत म्हणाले. कोणाला विचारून आम्हाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर काढले,असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची स्वत:ला देव समजण्याची धारणा चुकीची असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याला आम्ही नाही, तर भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचे राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. कुणीही स्वत:ला देव समजू नये, दिल्लीत मोठमोठे बादशाह आले आणि गेले, अशा शब्दांत राऊत यांनी एकेकाळी जुना मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला सुनावले आहे.