No Raksha Bandhan Celebration | हिंदू कालगणनेनुसार श्रावण महिना चालू झालेला आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातात. यातीलच भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण देखील देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर तिचे संरक्षण करेल असे वचन देतो. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु आपल्या भारतात असे एक गाव आहे, ज्या ठिकाणी रक्षाबंधन साजरी (No Raksha Bandhan Celebration) केली जात नाही. कारण तिथल्या मुलांच्या मनात एक खूप मोठी भीती आहे. त्यामुळे ते रक्षाबंधन साजरे करत नाही. पण नक्की हा प्रकार काय आहे? आणि कोणत्या गावात सुरू आहे हे आज आपण जाणून घेऊया.
रक्षाबंधनाच्या (No Raksha Bandhan Celebration) दिवशी बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला ओवाळणी म्हणून काहीतरी गिफ्ट देत असतो. अनेक बहिणी गिफ्ट साठी हट्ट करत असतात. परंतु बहिणीच्या या गिफ्टमुळे आपल्याला घर सोडावे लागू नये. अशी भीती अनेक गावकऱ्यांच्या मनात पूर्वीपासून आहे. त्या विरुद्ध आवाज देखील उठवण्यात आला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बहिणींनी आगळीवेगळी ओवाळणी मागू नये, यासाठी भाऊ राखी बांधून घेत नाही.
बेनिपुर गावातील प्रकार | No Raksha Bandhan Celebration
उत्तर प्रदेशातील बेनिपुर हे एक असे गाव आहे. ज्या ठिकाणी रक्षाबंधन साजरे होत नाही. हे गाव या रक्षाबंधनाच्या सणाला अपवाद आहे. कारण त्यांना वाटते की, बहिणींनी ओवाळणीमध्ये जर त्यांना गाव सोडून जायला सांगितले, तर ते काय करणार? ही भीती त्यांच्या मनात खूप पूर्वीपासूनच आहे. या गावांमध्ये यादव आणि ठाकूर या दोन समाजाची जास्त लोक राहतात. दोन्ही समाजाकडे खूप चांगली जमीनदारी होती. त्यांचे संबंध देखील चांगले होते.
परंतु गावातील जुनी मंडळी सांगतात की, ठाकूर या परिवारात गेल्या अनेक पिढ्यांमध्ये मुलाचा जन्म झालेला नाही. त्यावेळी ठाकूर परिवारातील एका मुलीने यादव परिवारातील एका मुलाला राखी बांधली आणि ही प्रथा कायम राहिली. हा सण मोठ्या उत्साहाने साजरा जात होता. आणि एकदा ठाकूर यांच्या मुलीने जमीनदाराच्या मुलाला राखी बांधली आणि ओवळणीमध्ये जमीन मागितली आणि त्यानंतर त्यांनी त्या दिवशी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
ठाकुराची मुलगी आणि गाववाल्यांनी त्यांना जमीनदाराला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकले नाही. आणि आपली जमीन सोणून कुटुंबाला घेऊन ते बेनिफर गावात येऊन राहू लागली. बेनेपूर गावात यादव समाज गेल्या अनेक वर्ष राहत होता. त्यांनी मिळून निर्णय घेतला की, इथून ठाकूर परिवाराकडून राखी बांधून घ्यायची नाही. त्यामुळे ते रक्षाबंधन साजरी करत नाही.