भौतिकशास्त्रातील यंदाचं नोबेल कॉस्मोलॉजीसाठी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सायटेक । नोबेल पारितोषिकांची घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे. २०१९ सालासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलं आहे. जेम्स पिब्लेस यांना सैद्धांतिक मांडणीसाठी तर मायकेल मेयर आणि डीडीएर क्वेलोझ यांना कॉस्मोलॉजीच्या आधारावर इतर सौरमालिकेतील पृथ्वीसदृश दुसऱ्या ग्रहाच्या शोधासाठी हे पारितोषिक देण्यात आलं आहे. जेम्स पिब्लेस यांना अर्धी रक्कम तर मेयर आणि क्वेलोझ यांना उर्वरित अर्धी रक्कम विभागून देण्यात येणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमीच्या गोरान हॅन्सन यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. १० डिसेम्बरला स्वीडनमधील ओस्लो येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात हे पारितोषिक वितरित करण्यात येईल. पिब्लेस हे ८४ वर्षांचे असून प्रिन्स्टन विद्यापीठात त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन प्रोफेसर ऑफ सायन्स म्हणून काम पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या विज्ञानावरील प्रेमासाठी इकडे या आणि ते जिद्दीनं पूर्ण करा असा सल्ला विज्ञान क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना जेम्स पिब्लेस यांनी पारितोषिक जाहीर झाल्यानंतर दिला.

 

 

Leave a Comment