रसायनशास्त्रातील यंदाचं नोबेल लिथीयम आयन बॅटरीच्या विकासासाठी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकांची घोषणा बुधवारी करण्यात आली. लिथीयम आयन बॅटरीच्या विकासात्मक कल्पना मांडल्याबद्दल तिघांना हे पारितोषिक देण्यात आलं आहे. जॉन बी गुडेनफ, एम.स्टॅनले व्हीटिंगहम आणि अकिरा योशिनो या तिघांना विभागून हे पारितोषिक देण्यात आलं आहे.

मोबाईल फोन, लॅपटॉप, विजेवर चालणारी वाहने तसेच इतर विद्युत उपकरणांमध्ये लिथीयम आयन बॅटरीचा होणारा वापर हे विकासाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल असल्यामुळे यंदाचं नोबेल पारितोषिक हे बिनतारी, जीवष्म इंधनाच्या पाठपुराव्यासाठी देण्यात आल्याचं रॉयल स्वीडिश अकॅडमीतर्फे सांगण्यात आलं.

तुम्ही रोज काहीतरी विचार करणं खूप गरजेचं असतं असं मत अकिरा योशिनो यांनी व्यक्त केलं. चालू स्थितीमध्ये आपण काय करणं आवश्यक आहे याचा विचार करून पुढे गेलो. संशोधनाचा उत्तम सेन्स मला आहे असं तुम्ही नक्कीच म्हणू शकता असंही योशिनो पुढे म्हणाले.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment