लसीकरणालासाठी चेंगराचेंगरी ; बजाजनगर आरोग्य केंद्रावरील घटना.

औरंगाबाद : लसीकरण करण्यासाठी रांगेत उभ्या नागरिकांमध्ये झालेल्या गोंधळा नंतर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार आज सकाळी बजाजनगर येथील मोहोटा देवी मंदिराजवळील आरोग्य केंद्रात घडली.

आज सकाळी बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर नागरिकानी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी केली होती. यावेळी वैधकीय स्टॅफ कडून नागरिकांना टोकन वाटले जात होते. तर महिला आणि पुरुष अशा दोन रांगा करण्यात आल्या होत्या. दरम्यान टोकन वाटप बंद झाल्याने कर्मचारी यांनी चॅनलगेट बंद केला व त्याच वेळी एकच गोंधळ उडाला व चेंगराचेंगरी सुरू झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही गंभीर जखमी झाला नसून किरकोळ खरचटले असल्याने प्रत्यक्षदर्शीनि सांगितले. ही घटना समजताच एम.आय.डी.सी.वाळूज पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत गोंधळ शमविला.

वैद्यकीय अधिकारी डॉ संग्राम बामणे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे, ” बजाजनगर येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. या केंद्रावर लसीचा साठा कमी होतो. तसेच गर्दी नियंत्रणात अनन्य साठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. आज झालेल्या गर्दीतील नागरिकांना १०० टोकं देण्यात आले. त्याचे लसीकरण उद्या सुरळीत होईल” असे ते म्हणाले.