हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जरी स्क्रीन टच मोबाईलचा जमाना आला आहे तरी बरीच जण अजूनही किपॅड मोबाईल वापरत आहेत. किपॅड मोबाईल हे स्क्रीन टच मोबाईलच्या तुलनेत खूपच टिकाऊ असून आजही त्याची क्रेझ काही कमी झाली नाही. म्हणून तर अजूनही किपॅड मोबाईलचे उद्पादन सुरूच आहे.
जगातील आघाडीची मोबाईल कंपनी नोकियाने बाजारात किपॅड असलेला स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे ह्या फोनमध्ये UPI पेमेंटचा पर्यायही उपलब्ध करण्यात आला आहे.
HMD ग्लोबलने नवीन फीचर्ससह NOKIA 105 आणि NOKIA 106 हे दोन नवीन फोन बाजारात आणले आहेत. NPCI ने हे दोन फोन NOKIA सोबत बाजारात आणले असून स्मार्टफोन प्रमाणे तुम्ही UPI 123PAY फीचर्सच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटही करू शकता. NPCI ने खास UPI 123PAY फीचर्स ह्या किपॅड स्मार्टफोनसाठी डिझाईन करण्यात आली आहे.
NOKIA 105 आणि NOKIA 106 ह्या दोन फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. NOKIA 106 सोबत IPS डिस्प्ले मिळतो . NOKIA 105 ला 1000 mAh ची बॅटरी तर NOKIA 106 ला 1450 mAh पॉवर ची बॅटरी देण्यात आली आहे . तसेच NOKIA 105 आणि NOKIA 106 फोन मध्ये वायरलेस FM सेवा उपलब्ध आहे. NOKIA 106 मध्ये इनबिल्ट MP3 प्लेयर देण्यात आला आहे. सध्या ह्या दोन्ही फोन ची विक्री ऑफलाईन आणि ऑनलाईन अश्या दोन्ही ठिकाणी होत आहे. NOKIA 105 ची किंमत 1299/- रुपये तर NOKIA 106 ची किंमत 2199/- रुपये असून बाजारात NOKIA 105 चारकोल,शियान आणि लाल रंगात तर NOKIA 106 चारकोल आणि ब्लू रंगात उपलब्ध आहे.