राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केलीत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा विक्रमी दिवस म्हणावा लागेल. अनेक महत्वाच्या नेत्यांनी आपआपली नामनिर्देशनपत्रे आज दाखल केलीत. उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे.

तपशील पुढीलप्रमाणे –
नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात १५ उमेदवार,
धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार,
जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार,
बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार,
अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार,
वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार,
अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार,
वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार,
नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ४० उमेदवार,
भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात २० उमेदवार,
गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार,
गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १० उमेदवार,
चंद्रपूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात २१ उमेदवार,
यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ३७ उमेदवार,
नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ९० उमेदवार,
हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १७ उमेदवार,
परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार,
जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४६ उमेदवार,
औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात ५९ उमेदवार,
नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० उमेदवार,
पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात २६ उमेदवार,
ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ६४ उमेदवार,
मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ९८ उमेदवार,
मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ३० उमेदवार,
रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ४० उमेदवार,
पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात १०१ उमेदवार,
अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ५० उमेदवार,
बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६४ उमेदवार,
लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ३३ उमेदवार,
उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार,
सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ८० उमेदवार,
सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३१ उमेदवार,
रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३ उमेदवार,
सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार,
कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात ६५ उमेदवार,
सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.


https://platform.twitter.com/widgets.js