उत्तर- मध्य मुंबई लोकसभा भाजपला अवघड जाणार?? काय आहे राजकीय गणित?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आपण जाणून घेऊयात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार (North Central Mumbai Lok Sabha) संघाविषयी … भाजपाला ज्यांनी महाराष्ट्रात बेस पक्का करून दिला ते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन दोन टर्म पासून उत्तर मध्य लोकसभेच्या खासदार आहेत… असं असलं तरी भाजपला मुंबईतील ज्या कुठल्या जागेविषयी सर्वात जास्त चिंता आहे…ती जागा म्हणजे हीच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ होय…सध्या भाजपने याठिकाणाहून विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) याना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे . परंतु त्यांना आव्हान असणार आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ….

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यातील विलेपार्ले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचे पराग अळवणी करतात. चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलिप लांडे, कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून सेनेचेच संजय पोतनिस, वांद्रे पश्चिममधून भाजपाचे आशीष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दिकी विद्यमान आमदार आहेत…त्यामुळे प्रथमदर्शनी एक अपवाद वगळता मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड आहे… मात्र या मतदारसंघाचा इतिहास बराचसा बदलता आणि सर्वसमावेशक असल्याचं पाहायला मिळतं… पण 2014 च्या निवडणुकीने या मतदार संघाला तळापासून बदलून टाकलं…कारण मोदी लाट असली तरी देखील प्रिया दत्त यांचा उत्तर मध्य मुंबईमधील करिष्मा हा कायम होता…त्यांच्या विरोधात आपला निभाव लागणार नाही या भीतीने भाजपतील नेत्यांनी निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली नाही…असं बोललं जातं की भाजपकडून 2014 साली नाना पाटेकर यांना ऑफर होती…मात्र त्यांनी याला साफ नकार दिला होता…शेवटी कुठलाच पर्याय नव्हता म्हणून भाजपतील वरिष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पुनम महाजन यांनी धाडस दाखवलं…आणि तगड्या आणि पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या प्रिया दत्त यांचा पराभव करत पूनम महाजन अवघड अशा या मतदारसंघातून तरुण वयातच दिल्लीत गेल्या…1 लाख 86 हजार मतांच्या लीडने त्यांचा हा विजय झाला होता…

Mumbai North Central Lok Sabha | मुंबईतील भाजपासाठीचा सर्वात अवघड मतदारसंघ  | Poonam Mahajan

2019 मध्ये ही प्रिया दत्त आणि पूनम महाजन यांच्यातच प्रमुख लढत झाली…निकालही अगदी सेम टू सेम…मात्र यावेळेस निवडणूक जिंकताना पूनम महाजन यांना बरीच कसरत करावी लागली, त्रासही सहन करावा लागला आणि निवडणूक जिंकल्या असल्या तरी महाजनांचे मताधिक्य 1 लाख 30 हजार वर येऊन थांबलं…ही भाजपासाठी नक्कीच धोक्याची घंटा होती. दुसऱ्या बाजूला आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत…प्रिया दत्त मागील टर्मला थोड्या नाखुशीनेच का होईना पण निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या…यावेळेस मात्र त्या काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची शक्यता धूसर दिसतेय…साध्या भाषेत सांगायचं तर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे म्हणावा असा चेहरा शिल्लक राहिलेला नाहीये…त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी कोण उमेदवार असणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे…

विलेपार्ले, बांद्रा पश्चिम या मतदारसंघात भाजपला जास्त लीड मिळत आलीय…भाजपचे आशिष शेलार याच भागातून येतात त्यामुळे त्यांचाही बॅक सपोर्ट भाजप उमेदवाराच्या पाठीशी असणार आहे…मात्र बांद्रा पूर्व ज्या ठिकाणी मातोश्री निवासस्थान आहे तिथे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत…तर शिवसेनेचाही सपोर्ट ग्रुप मोठा आहे…कुर्ला आणि कलिना इथे दोन्हीही बाजूंना मतदान होण्याची शक्यता सारखी आहे…आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक जरा वेगळी असणार आहे…याला महत्त्वाचं कारण म्हणजे या भागात असणारी शिवसैनिकांची भारी भक्कम फौज…2019 पर्यंत भाजपच्या उमेदवाराला ठाकरे या मतदारसंघातून चांगली लीड घेऊन देत होते…मात्र यंदा ही लीड काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी लावताना ते दिसणार आहेत…फक्त विखुरलेल्या मतदारांना एकत्र आणण्याचं स्किल काँग्रेस उमेदवाराला करावं लागणार आहे…त्यापेक्षा महाविकास आघाडी समोरच हे सर्वात मोठे दिव्य असणार आहे, असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.