North East Express Accident : रेल्वेच्या भीषण अपघाताने देश हादरला!! मृत- जखमींच्या संख्येत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बिहार मधील बक्सर जिल्ह्यात नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचा अपघात (North East Express Accident) झाला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस देशाची राजधानी दिल्ली येथील आनंद विहार स्थानकातून सुरु होऊन आसाम मधील गुवाहाटी पर्यंत चालवली जाते. याचवेळी बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्थानकाजवळ असताना  रेल्वेचे काही डब्बे पटरीवरुन खाली सरकले त्यामुळे हा अपघात झाल्याचे कळत आहे.

याबाबत नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे गार्ड विजय कुमारने सांगितलेल्या माहितीनुसार, “ट्रेन आपल्या साधारण गतीने जात असताना अचानक  ब्रेक लावण्यात आल्याने ट्रेनचे डब्बे पटरीवरून खाली घसरले.”  मात्र अचानक ब्रेक का लावले गेले याबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसच्या या अपघातात (North East Express Accident)  एकूण  6 डब्बे सरकले असून अपघातातील जखमीमध्ये 20 जण गंभीर आहेत. जखमी असलेल्या प्रवाशांमध्ये मृत्यूचा आकडा वाढण्याची  शक्यता  आहे. अपघातात जखमी प्रवाशांना पाटणा येथील एम्म्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघातात अडकलेल्यांना मिळेल मदत – North East Express Accident

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले  की अपघात स्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल पोहचले असून अपघातातील अडकलेल्याना सर्व प्रकारची मदत दिली जाईल . तर दुसरीकडे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले की, बचावकार्य जलद  गतीने  करण्यासाठी बक्सर व भोजपुर जिल्ह्याच्या आपत्ती निवारण  विभाग  व आरोग्य विभागाशी त्यांचा संवाद झाला असून योग्य वेळेत मदत पोहचवली जाईल. आसामचे मुख्यमंत्री देखील या घटनेवर नजर ठेऊन आहेत.

कुटुंबियांना मिळेल 10 लाख  रुपये मदत

दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये मदत दिली जाईल व जखमीना 50 हजार रुपये मदत स्वरूपात दिले जातील. तर बिहार सरकारने देखील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये मदत म्हणून देण्यात येतील अशी घोषणा केली आहे.