कराड उत्तरमध्ये महायुतीला बंडाचं ग्रहण; माघार कोण घेणार – मनोज घोरपडे की धैर्यशील कदम ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

निवडणूक जवळ आली असताना काँग्रेस,राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपालाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. सातारा जिल्हयातील कराड उत्तर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या धैर्यशील कदम यांनी महायुतीच्या वतीने फॉर्म भरल्यामुळे भाजपच्या मनोज घोरपडे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. शिवसेनेनं आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने मनोज घोरपडे समर्थकांमध्ये संतापाचं वातावरण असून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना घोरपडे समर्थकांनी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मनोज घोरपडे हे मागील ५ वर्षांपासून अधिक काळ कराड उत्तर भागात भाजप पक्ष बांधणीचं काम करत आहेत. सोबतच त्यांनी आपल्या भागातील अनेक विकासकामांसाठी निधीही राज्य सरकारकडून मिळवून दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागे जाहीर प्रचार सभेत बोलताना मतदार संघ कुणाकडेही असो मनोज घोरपडेंना तिकीट मिळणारच असं जाहीर केलं होतं. सेना-भाजप युती झाल्यानंतर भाजप पक्षाकडून फॉर्म देण्यात येत नाही हे लक्षात आल्यानंतर मनोज घोरपडे यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला. कराड उत्तर विधानसभा क्षेत्रात महायुतीने दिलेल्या उमेदवाराला जनाधार नसून येथील खरी लढत मनोज घोरपडे विरुद्ध बाळासाहेब पाटील अशीच होईल असा अंदाज नागरिकांनीही व्यक्त केला आहे.

Leave a Comment