किम जोंग उन अभी जिंदा है! एका कार्यक्रमातील फोटो प्रसिद्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । मागील काही आठवड्यांपासून उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी अखेर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. उत्तर कोरियाच्या शासकीय माध्यमांनी किम जोंग उन यांचा एका कार्यक्रमातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. किम जोंग उन यांनी शुक्रवारी एका खत कारखान्याचे उद्घाटन केले. त्याचे फोटो उत्तर कोरियातील माध्यमांनी प्रकाशित केले आहेत.

किम जोंग उन या फोटोत लाल फित कापून कारखान्याचे उद्घाटन करताना दिसत आहेत. यावेळी किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचेही दिसत आहे. फोटोत त्यांच्याशिवाय त्यांची बहीण किम यो जोंग आणि काही अधिकारी दिसत आहेत. त्याशिवाय किम यांनी १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली असल्याचे म्हटले आहे. यावेळी हजारो कोरियन नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. उत्तर कोरियाने हे फोटो प्रकाशित केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

किम जोंग उन हे याआधी ११ एप्रिल रोजी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर १५ एप्रिल रोजी उत्तर कोरियाचे दिवंगत कम्युनिस्ट नेते आणि त्यांचे आजोबा किम जोंग इल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. हृदयावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर किम यांची प्रकृती ढासळली असल्याचे वृत्त सीएनएनने दिले होते. त्यानंतर जगभरात त्यांच्याबाबत चर्चा सुरू झाली होती. चीनने देखील एक डॉक्टरांचे पथक उत्तर कोरियाला पाठवले असल्याचे वृत्त राउटर या वृत्तसंस्थेने दिले होते.त्यानंतर तर किम जोंग उन काही दिवसात कालवश होण्याच्या वावड्यासुद्धा अनेक प्रसार माध्यमात उठत होत्या मात्र, आता किम जोंग यांचा जाहीर कार्यक्रमातील फोटो समोर आल्यांनतर त्याच्या मृत्यूच्या चर्चांना कदाचित विराम लागेल असं दिसतंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment